
अभिनेते धर्मेंद्र हे त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. धर्मेंद्र यांचे दोन लग्न झाले आहेत. 19 व्या वर्षीच धर्मेंद्र यांचे लग्न झाले होते. पहिल्या लग्नाच्या 26 वर्षानंतर त्यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केले.

दोन लग्न झालेले असताना देखील आपल्यापेक्षा 27 वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात धर्मेंद्र हे पडले होते. अभिनेत्री अनिताने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

नौकर बीवी का, इंसानियत के दुश्मन, जलजला अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यानंतर यांच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगताना दिसली.

अनिता आणि धर्मेंद्र यांच्या अफेअरबद्दल हेमा मालिनी यांना समजले. यावेळी धर्मेंद्र यांच्यासोबतचे नाते न तोडता. थेट अनितालाच खडेबोल हेमा मालिनी यांनी सुनावले.

हेच नाही तर धर्मेंद्र यांच्यासोबत चित्रपटात काम करण्यासही तिला मनाई केली. मात्र, अनेक वर्षे धर्मेंद्र आणि अनिता यांच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगताना दिसली.