Ram Kapoor: मी ६ महिन्यांत मरु शकतो; राम कपूरचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय झालं?
गेल्या काही दिवसांपासून लॉक अप या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेला अभिनेता राम कपूर चांगलाच आहे. शोमधील स्पर्धकाला सतत किस केल्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. आता राम कपूर पुन्हा चर्चेत आहे. त्याने नुकताच केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

लॉकअप हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक सतत काही तरी नवे ड्रामे करताना दिसत आहेत. अभिनेता राम कपूरने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतला आहे. नुकताच राम कपूरने केलेल्या खुलाशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने मी पुढच्या 6 महिन्यात मरु शकतो असे म्हटले आहे. आता राम कपूर असं नेमकं का म्हणाला? वाचा सविस्तर...

लॉकअपमध्ये बोलताना राम कपूरने ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेच्या वेळी प्रचंड त्रासातून जात असल्याचे सांगितले. त्यावेळी तो डिप्रेशनमध्ये होता. डॉक्टरांनी तर तिच्या जीवनशैली पाहून पुढच्या सहा महिन्यात तुमचा मृत्यू होईल असे सांगितले होते.

राम कपूरने पुढे सांगितले की त्याची पत्नी गौतमीलाही याबाबत काहीही माहीत नव्हते. ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेच्या काळात मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट डिप्रेशनमधून गेलो होतो. पण मालिकेमुळे मला प्रेम मिळाले. माझ्या लठ्ठपणामुळे इतकी चर्चा झाली की थोड्या काळासाठी सर्वाधिक रेटिंग असलेला स्टार बनलो होतो. आणि मी जास्त जास्त जाड होत गेलो असे राम कपूर म्हणाला.

राम कपूरने पुढे सांगितले की, माझ्या डॉक्टरने मला सांगितले की मी इतका अस्वस्थ झालो आहे की पुढच्या ६ महिन्यांमध्ये माझा मृत्यू होऊ शकतो. मला डायबेटिक स्ट्रोक येऊ शकतो. कारण मला दिवसातून तीन वेळा इन्सुलिन घ्यावे लागत होते. माझी शुगर ४००, ५००, ६००पेक्षा जास्त झाली होती आणि मी दिवसाला १४-१४ तास काम करत होतो.

राम कपूरने पुढे सांगितले की त्याला यावर काहीच करायचे नव्हते कारण त्याला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत होते. नाव आणि पैसा देखील मिळत होते. तसेच या सगळ्यामुळे त्याच्या वागणूकीत बदल झाले होते. “मी खूप वाईट माणूस बनलो होतो. मी ६-६ तास उशिरा शूटिंगवर येत होतो. सेटवर बसून दारू पित होतो. मी राक्षस बनलो होतो” असे तो म्हणाला. पण मुलांमुळे त्यांना हिंमत मिळाली. त्या