AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपोषण सोडताच मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय, बीड सोडून थेट संभाजीनगरला रवाना; कारण काय?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवसानंतर उपोषण सोडले आहे. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बीडहून तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयाकडे नेण्यात येत आहे. रुग्णालयात त्यांना तातडीने अ‍ॅडमिट केले जाणार आहे.

उपोषण सोडताच मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय, बीड सोडून थेट संभाजीनगरला रवाना; कारण काय?
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 10:17 AM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 20 दिवसानंतर उपोषण सोडलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनानंतर जरांगे यांनी मध्यरात्री उपोषणाची सांगता केली. त्यानंतर जरांगे यांनी आता बीड सोडलं आहे. बीडच्या पाटोद्यातून जरांगे थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारीही आहेत. जरांगे यांची तब्येत खालावलेली असल्याने त्यांना उपचारासाठी संभाजीनगरकडे नेले जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा कालचा मुक्काम बीडच्या पाटोद्यात होता. रात्री उपोषणाची सांगता झाल्यानंतर जरांगे छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आहेत. जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेणार आहेत. जरांगे संभाजीनगरकडे रवाना झाल्याचं कळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. क्षीरसागरही जरांगे पाटलांसोबत संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

कशी आहे जरांगेंची प्रकृती?

जरांगे यांची प्रकृती कालच बिघडली होती. त्यामुळे त्यांना स्टेजवरच सलाईन लावण्यात आली होती. तसेच डॉक्टरांनी त्यांना प्रवास टाळून अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला दिला होता. जरांगे यांना अतिसाराची लागण झाली आहे. तसेच त्यांचा मेंदू, यकृत आणि किडनी कायमच्या निकामी होण्याचा मोठा धोका ओढवला आहे. त्यांच्या लघवीच्या अहवालात ‘किटोन’ आढळले आले आहे. सद्यस्थितीत प्रवास करणे अत्यंत जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे, असा कालचा अहवाल होता. तरीसुद्धा जरांगेंनी 24 तास पाणी न घेतल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती.

चार ते पाच दिवस उपचार?

जरांगे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी नेण्याची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं होतं. जरांगे यांची प्रकृती अधिक बिघडू नये म्हणून ICU मॉनिटर घेऊन डॉक्टर आंदोलन स्थळी दाखल झाले होते. जरांगे यांच्या हृदयाचे ठोके, ऑक्सिजन लेवल, बीपी आदींवर डॉक्टर लक्ष ठेवून होते. त्यामुळेच जरांगे यांना तातडीने गॅलेक्सी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. या ठिकाणी जरांगेंवर उपचार करण्यात येणार आहे. गॅलेक्सी रुग्णालयात जरांगे यांना किमान चार ते पाच दिवस उपचार घ्यावे लागतील, असा अंदाज आहे. तसेच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही जरांगे यांना आराम करावा लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Follow Us
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान