
हिरामंडीच्या अभिनयासाठी शेखर सुमन यांचे काैतुक केले जात आहे. हिरामंडीमध्ये धमाकेदार अभिनय करताना शेखर सुमन हे दिसले आहेत.

आता नुकताच शेखर सुमन यांनी हिरामंडीमधील ओरल सेक्स सीनबद्दल मोठा खुलासा केलाय. याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

मुलाखतीमध्ये शेखर सुमन म्हणाले की, तो सीन करून जेंव्हा मी घरी परतलो, त्यावेळी मी अजिबात पत्नीला काही बोलू शकलो नाही. मी शांत होतो.

पत्नीने मला विचारले, तुम्ही आज कोणता सीन शूट करून आलात ते मला सांगितले नाही. मी तिच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटलो की, तुला सांगण्यासारखे नाहीये.

हेच नाही तर ते तुला दाखवू पण नाही शकत. त्यामुळे थेट तू तो सीन सीरिज रिलीज झाल्यानंतरच बघ. आता शेखर सुमन यांच्या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहेत.