
अंकिता लोखंडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे काही दिवसांपूर्वीच बिग बाॅसच्या घरात धमाल करताना दिसले.

आता नुकताच अंकिता लोखंडे हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना अंकिता लोखंडे ही दिसली आहे.

अंकिता लोखंडे म्हणाली की, माझ्यासाठी पैसा महत्वाचा अजिबात नाहीये, मी कायमच पैशाला दोन नंबरला ठेवते आणि भूमिकेला एक नंबरला ठेवते.

हेच नाही तर अंकिता लोखंडे हिने हे देखील म्हटले की, मी कधीच पैशांच्या मागे पळाले नाहीये. मी कायमच भूमिकांच्या मागे लागते.

मी फ्रीमध्ये देखील काम करण्यास तयार असल्याचे सांगताना अंकिता लोखंडे ही दिसली आहे. आता अंकिता लोखंडेची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आलीये.