
भाग्यश्रीने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोना कॅप्शन देताना ती म्हणाली की , माझ्या पोस्ट्सकडे नेहमीच वास्तववादी दृष्टीकोन असतो. आणि मी तो नेहमी ठेवते.

मला एका वर्षापासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे माझे वजन वाढत आहे. इतरांवर टिप्पणी करताना संवेदनशील असले पाहिजे हे तुम्हा सर्वांना माहीत नसले तरीही.

त्यामुळे कृपया तुम्ही माझ्या प्रवासाचे कौतुक करू शकत नसाल तर माझ्या सध्याच्या टप्प्यावर भाष्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. असे म्हणत युझर्सला फाटकारले आहे.

भाग्यश्रीने 'काय रे रास्कला' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.

भाग्यश्रीने नुकतेच सोशल मीडियावर पोहतानाचे फोटो शेअर केले आहेत. भाग्यश्रीने मुळची पुण्याची असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे . तिने अर्थशास्त्रात तिची पदवी घेतली आहे.

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सतत सक्रीय असून, या माध्यमातून भाग्यश्री चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर आपले फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.