
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले फोटो व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांना आपले अपडेट देत असते.

मराठी चित्रपट सृष्टीत भाग्यश्री आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. कामीआपले बोल्ड फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकतंच सोशल मीडियावर आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने स्पोर्ट काळ्या ब्रा घातली आहे.

Comfortable in my Skin अशी कॅप्शन तिने या फोटोना दिली आहे.तिच्या या फोटोंवर चाहत्यांनो हार्ट, स्माईल , लव्हच्या इमोजीच्या कमेंट केल्या आहेत.

तिचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडत असते हे मात्र नक्की. 'काय रे रास्कला' याचित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर',या चित्रपटातही ती दिसली होती.

काही दिवसांपूर्वी तिने आपल्या शरीरावर गोंदवलेल्या टॅटूमुळे ट्रोल झाली होती. तिने आपल्या शरीरावर महामृत्युंजय मंत्र गोंदवला आहेत.