
प्रसिद्ध अभिनेत्री डेलनाज ईरानी ही कायमच चर्चेत असते. डेलनाज ईरानी हिने मोठा काळ चित्रपटांसह मालिकेत गाजवला आहे. डेलनाज ईरानी धमाकेदार भूमिकेने सर्वांच्या मनावर राज्य करते.

नुकताच अभिनेत्रीने तिच्या पर्सनल लाईफबद्दल मोठे खुलासे केले. मनातील दु:ख अखेर सांगून टाकले आहे. डेलनाज ईरानी म्हणाली, माझ्या आयुष्यात मोठे वादळ आले आणि माझे 14 वर्षांचे लग्न तुटले.

मला त्यावेळी समजले की, माझ्या कामामुळे माझी पर्सनल लाईफ खराब झाली. 2010 मध्ये मी आणि राजीव वेगळे झालो आणि त्यानंतर 2012 मध्ये आमचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर माझ्या आयुष्यात डीजे पर्सी ककरियाची आगमन झाले. मी आता त्याच्यासोबत खुश आहे. जे झाले त्याच्यासाठी मी कोणालाच दोषी ठरवत नाही.

कामामुळे मी माझ्या पर्सनल लाईफकडे म्हणावे तसे लक्ष देऊ शकत नसल्याचे देखील डेलनाज ईरानीने म्हटले आहे. आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.