जांभळ्या साडीत गौरी कुलकर्णीचं खुललं सौंदर्य, हटके पोजची होतेय प्रचंड चर्चा
मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णीचं वाढदिवसानिमित्त खास फोटोशूट. जांभळ्या साडीमधील सौंदर्याने वेधलं सर्वांचं लक्ष. हटके पोजची होतेय प्रचंड चर्चा.

अभिनेत्री गौरी कुलकर्णी ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचली आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या साध्या आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचीही नेहमी चर्चा होत असते.
नुकताच गौरीने आपला वाढदिवस साजरा केला असून तिने वाढदिवसानिमित्त खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील तिचा मनमोहक अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
या फोटोशूटसाठी गौरीने जांभळ्या रंगाची सुंदर कॉटन साडी नेसली आहे. या साडीवर पांढऱ्या रंगाच्या छोट्या हृदयांची नाजूक डिझाईन असून पदरावर पारंपरिक नक्षीकाम करण्यात आले आहे.
या साडीला तिने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊजची जोड दिली आहे. चेहऱ्यावरील मिश्कील हास्य आणि सोज्वळ अंदाजामुळे तिचा हा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
गौरीचे हे फोटो सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी तिच्या लूकचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. तिच्या या साध्या, सुंदर आणि मनमोहक अंदाजावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.