
ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. या मालिकेतील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जुई सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अनेक कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्री जुई गडकरीसोबत असेच काहीसे घडले आहे. पण ती या ट्रोलिंगमुळे शांत बसलेली नाही. तिने ट्रोल करणाऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

जुईने नुकताच एक फोटोशूट केले. त्या फोटोशूटवर अनेकांनी कमेंट केल्या. पण काहींनी जुईला पर्सनलवर मेसेज केले. याचा स्क्रीनशॉट जुईने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

'जुई लग्न कर.. कोण असूदेत पण कर.. TRP कमी होतोय मॅडम, तुमचं मार्केटिंग आधीच कमी पडलय. मेकअप आणि दिसणं हे वेगळं असतं. मालिकेत तुम्ही मोठ्या असाल पण लग्न नाही, कुटुंब नाही.. विचार करा' असे मेसेज एका यूजरने केले.

जुईने हा स्क्रीनशॉट शेअर करत 'अशा माणसांची कीव येते... लवकर बरे व्हा... देव तुम्हाला सुबुद्धी देवो.. देवाच्या कृपेने तुमचा त्रास लवकरात लवकर कमी होवो..' असे कॅप्शन दिले आहे.