
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने नुकतीच तिच्या लग्नाची घोषणा केली.

काजलने तिच्या बहिणीसोबत खास ‘बॅचलर’ पार्टी आयोजित केली होती.

या धमाकेदार ‘बॅचलर’ पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये काजल बहीण निशासोबत मस्ती करताना दिसत आहेत.

दोन्ही बहिणींनी या आनंदाच्या क्षणी खास फोटोशूट केले आहे.

अभिनेत्री काजल अग्रवाल बहीण निशा अग्रवालला सगळ्यात जवळची मैत्रीण मानते.

अनेकदा दोघी आपले एकत्र फोटो शेअर करत असतात.

या फोटोंमधून दोघींच्या नात्यातला हळवा बंध दिसून येतो.

काजल अग्रवाल 30 ऑक्टोबरला व्यावसायिक गौतम किचलूसह विवाह बंधनात अडकणार आहे.