
अभिनेत्री किश्वर मर्चेंट हिने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. 2021 मध्ये किश्वर मर्चेंट हिने एका बाळाला जन्म दिला. मात्र, डिलीवरीनंतर किश्वर मर्चेंट हिचे वजन चांगलेच वाढले.

डिलीवरीनंतर आता किश्वर मर्चेंट हिने तब्बल 14 किलो वजन हे कमी केले आहे. विशेष म्हणजे आता ती अगोदरप्रमाणे फिगरमध्ये देखील आलीये. किश्वर मर्चेंट हिने याची माहिती आपल्या चाहत्यांना दिलीये.

डिलीवरी झाल्यानंतर किश्वर मर्चेंट हिचे वजन इतके जास्त वाढले होते की, तिला साधे जमिनीवर बसणे देखील शक्य होत नव्हते. यामुळे किश्वर मर्चेंट हिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

खास डाएट फाॅलो करत किश्वर मर्चेंट हिने तब्बल 14 किलो वजन हे कमी केले आहे. किश्वर मर्चेंट हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे पूर्वी वाढलेले वजन अगोदर दिसत आहे.

व्हिडीओच्या शेवटी तिचे कमी झालेले वजन दाखवताना किश्वर मर्चेंट ही दिसत आहे. 14 किलो वजन कमी करण्यासाठी किश्वर मर्चेंट हिने खूप जास्त मेहनत घेतल्याचे तिने सांगितले.