
टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉय आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे.

अनेकदा त्यांच्या हॉट फोट सोशल मीडियात पोस्ट करत असते. मौनी सध्या पती सूरज नांबियारसोबत तुर्कीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

तुर्कीमधील सुट्टीचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केले आहेत. यामध्ये समुद्र किनाऱ्यावरील फोटो पोस्ट दिले आहेत. तिच्या या लुकने चाहत्यांची मने घायाळ केली आहेत.

मौनी रॉयने थाई हाई स्लिट गाउन परिधान केला आहे. या सोबतच तिने साइड स्लिंग बॅग कॅरी केली आहे. या पेहरावासोबत मौनीने लाईटमेकअप व लाँग बूट घातले आहे.

या लूकमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. अनेकांनी हार्ट, फायरच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत .

मौनी रॉयच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं. काही युजर्सनी फायर इमोजी कमेंट केले आहे. काहीं नेटकऱ्याने खूप सुंदर असे लिहिले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले - किलर असे लिहिले आहे.