
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींना काम करताना कायमच वेगवेगळे अनुभव येत असतात. नुकताच एका अभिनेत्रीने अभिनेता अक्षय कुमारवर आरोप केले आहेत. अक्षय कुमार आणि या अभिनेत्रीने एकच सिनेमामध्ये एकत्र काम केले. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे.

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत तिचे नाव मोहिनी आहे. अक्षय कुमार आणि तिने 1991 साली 'डांसर' या सिनेमात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर मोहिनीने कधीही बॉलिवूडमध्ये काम केले नाही. ती बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री ठरली. तिने शिवाजी गणेशन, चिरंजीवी से लेकर ममूटी, मोहनलाल, बालकृष्ण आणि इतर सुपरस्टार्स सोबत काम केले.

मोहिनी ही 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ठरली. तिन आरके सेलवमणीच्या 'कनमनी' सिनेमा अभिनेता प्रशांतसोबत काम केले. या चित्रपटातील रोमँटिक गाणे तुफान चर्चेत होते. कारण प्रशांत आणि मोहिनी यांनी यांनी स्विमिंगपूलमध्ये रोमँटिक सीन दिला होता.

मोहिनीने आता खुलासा केला आहे की बोल्ड सीन्स करण्यासाठी कायमच तिच्यावर दबाव टाकण्यात आला होता. "दिग्दर्शक आर. के. सेल्वमणि यांनी या स्विमिंग सूट सीनची योजना आखली होती. मी खूप अस्वस्थ झाले, रडले आणि हे करण्यास नकार दिला. त्यामुळे शूटिंग अर्धा दिवस थांबवावं लागलं" असे मोहिनी म्हणाली.

पुढे ती म्हणाली, "मी समजावण्याचा प्रयत्न केला की मला पोहता देखील येत नाही आणि मी एका पुरुष ट्रेनरसमोर अर्धवस्त्र घालून पोहायला कसे शिकू? त्या काळात महिला ट्रेनर फारशा नव्हत्या. त्यामुळे हे करणे माझ्यासाठी अशक्य होते. 'उदल थाजुव'साठी मला हा सीन करायला अक्षरशः भाग पाडण्यात आले होते."

मोहिनीने हा सीन शूट करणे मान्य नव्हते तरीही तो करावा लागला."मी अर्धा दिवस काम केलं आणि त्यांनी जे मागितलं ते दिलं. नंतर, जेव्हा त्यांनी सांगितलं की तोच सीन ऊटीमध्ये चित्रित करायचा आहे, तेव्हा मी नकार दिला. जेव्हा त्यांनी सांगितलं की चित्रिकरण पुढे चालणार नाही, तेव्हा मी म्हणाले, 'ही तुमची समस्या आहे, माझी नाही. आधीही तुम्ही माझ्यावर जबरदस्ती केली होती" असे ती म्हणाली.

मोहिनी पुढे म्हणाली, "म्हणूनच 'कनमनी' हा एकमेव चित्रपट होता ज्यामध्ये मी माझ्या मनाविरुद्ध, खूपच बोल्ड दिसले. कधीकधी गोष्टी एखाद्याच्या इच्छेविरुद्ध घडतात, आणि हा सीन त्याचं एक उदाहरण होतं."

मोहिनीने नंतर 'आदित्य ३६९', 'हिटलर', 'इनाथे चिंथा विशयम', 'ओरु मरवथूर कनवु', 'वेशम', 'गडिबिडी अलीया', 'पुधिया मन्नारगल', 'लाली' यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्या शेवटच्या वेळी २०११ मध्ये आलेल्या 'कलेक्टर' या चित्रपटात दिसल्या होत्या.