
अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी नुकतंच लग्न केलं. या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली. लग्नानंतर या जोडप्याने मित्रांना पूल पार्टी दिली आहे.

या पूल पार्टीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याला मौनीने एकमेकांसोबत चांगला वोळ घालवणं चांगलं असतं, असं कॅपशन दिलं आहे.

या पार्टीत मौनी आणि सूरज आपल्या मित्रांसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहेत. मौनीच्या खास मैत्रिणींना या कार्यक्रमाला हजेरी लावली हो

मौनीने सूरज सोबतचे काही रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मौनी आणि सूरज यांनी 27 जानेवारीला गोव्यात लग्न केलं. मात्र या लग्नाला मोजके लोक उपस्थित होते. त्यामुळे आपल्या मित्रांना त्यांनी पार्टी दिली आहे.