
चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूप चर्चेत आहे. बर्याच काळापासून मौनी रॉय दुबई स्थित बँकर सूरज नंबियार (suraj nambiar) याला डेट करत होती आणि आता लवकरच या दोघांचे लग्न होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, मौनी रॉयची आई सूरज नंबियार यांच्या कुटुंबाला भेटली. यावेळी त्यांनी सूरज आणि मौनीच्या लग्नाविषयी बोलणी केली.

कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये मौनी रॉय आणि सूरज नंबियार एकमेकांना प्रथमच भेटले. या दिवसांत, मौनी रॉय दुबईमध्ये होती आणि तिने संपूर्ण वेळ तिची बहीण, मेहुणे आणि मुलांसह घालवला. रिपोर्ट्सनुसार, त्याच वेळी मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांची जवळीक वाढली.

सूरज नंबियार यांचे वय माहित नसले तरी, तो तीस वर्षाचा असल्याचा चाहत्यांचा अंदाज आहे. दुबईत राहणारा सूरज हा बँकर असून, मुळचा बंगळुरूमधील जैन कुटुंबातील आहे. त्याने आर.व्ही. अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बी.टेक केले आहे. तसेच, स्टॅनफोर्ड विद्यापीठात गुंतवणूक, विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाचा पदविका अभ्यास केला आहे.

सूरजने ‘अशोक इंडिया’ या कंपनीत इंटर्न म्हणून काम केले होते. सध्या तो इन्व्हिक्टस म्हणून एका प्रसिद्ध इंजिनीअरिंग अँड बिजनेस डेव्हलपमेंट कंपनीत कार्यरत आहे. तसेच तो, असोसिएशन ऑफ चार्टर्ड अल्टरनेटिव इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्टचा सदस्य असून, युएईमधील कॅपिटल मार्केटचा डायरेक्टर हेड आहे.

मौनी रॉयनेही इंस्टाग्रामवर सूरज नंबियार यांच्याबरोबरचे नाते ऑफिशियल केले आहे. तिने सूरज सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इतकेच नाही तर, नंतर मौनी रॉयने सूरज आणि त्याच्या कुटुंबीयांसह एक फोटो शेअर केला आणि त्यात तिने सूरजच्या आई-वडिलांना ‘मॉम’ आणि ‘डॅड’ म्हणून संबोधित केले आहे. रिपोर्ट्सनुसार, मौनी रॉय सूरजच्या कुटुंबात बर्यापैकी रमली आहे आणि ती त्यांच्यात चांगलीच मिसळली आहे.