तिसरी पत्नी असूनही सुखात जगते ही अभिनेत्री, संपत्तीसमोर जगही फिकं

बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जी एका व्यक्तीची तिसरी बायको बनून देखील आयुष्यात आहे प्रचंड खुश. अभिनेत्रीची संपत्ती पाहून उडेल तुमची देखील झोप. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Apr 25, 2026 | 3:14 PM
1 / 7
टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत राहतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे नेहा पेंडसे. ‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली नेहा पेंडसे सध्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

2 / 7
नेहा पेंडसेने उद्योगपती शार्दुल सिंह बायस यांच्याशी लग्न केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. कारण शार्दुल सिंह बायस यांचे हे तिसरे लग्न होते. त्यामुळे अनेकांनी नेहाने केवळ पैशांसाठीच हे लग्न केल्याचा आरोप केला.

3 / 7
मात्र या आरोपाकडे दुर्लक्ष करत नेहा पेंडसेने आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा निर्णय घेतला. अनेक वेळा तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं. नेहाचं स्पष्ट मत आहे की लोक काय बोलतात याकडे जास्त लक्ष देऊ नये.

4 / 7
नेहा पेंडसेच्या संपत्तीबाबत बोलायचं झालं तर तिची एकूण नेटवर्थ सुमारे 125 मिलियन डॉलर्स असल्याचं सांगितलं जातं, जी खूप मोठी रक्कम आहे. अभिनयासोबतच विविध प्रोजेक्ट्स आणि ब्रँड्समुळे तिने ही संपत्ती कमावली आहे.

5 / 7
दरम्यान, नेहाने अलीकडेच तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभवही शेअर केला. ती एकदा जॉगिंगसाठी बाहेर गेली असताना एका अनोळखी व्यक्तीने तिला रस्ता विचारला. मदत करण्यासाठी ती त्याच्या जवळ गेली असता त्या व्यक्तीने तिला पकडून कार सुरू केली.

6 / 7
हा प्रसंग खूपच भीतीदायक होता. मात्र, नेहाने धाडस आणि प्रसंगावधान दाखवत स्वतःची सुटका करून घेतली. हा अनुभव ऐकल्यानंतर तिचे चाहतेही चिंतेत पडले असून त्यांनी तिला स्वतःची सुरक्षा वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

7 / 7
सध्या नेहा पेंडसेने टीव्हीपासून थोडं अंतर ठेवलं आहे. ती आता ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मराठी चित्रपटसृष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. त्याचबरोबर ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातही आनंदी असून पतीसोबत वेळ घालवण्यालाही प्राधान्य देते.

Follow Us