
अभिनेत्री या कामयच चर्चेत असतात. त्यांच्या निखळ सौंदर्यवर कायमच चाहते फिदा असतात. पण तुम्हाला माहिती आहे का अनेक अभिनेत्रींच्या आयुष्यातील एक काळ हा अतिशय वाईट असतो. त्यांना अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. असेच काहीसे एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडले आहे. तिने एका मुलाखतीमध्ये केलेल्या खुलास्याने अनेकांना धक्का बसला आहे. ही अभिनेत्री कोण आहे आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं चला जाणून घेऊया...

आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री पार्वती थिरुवोथु आहे. तिने नुकताच 'द मेल फेमिनिस्ट' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या. लहानपणी तिला आलेले अनुभव हे अतिशय वाईट होते. हे देखील तिने सांगितले.

पार्वतीने सांगितले की, तिला लहानपणापासूनच अनोळखी पुरुषांकडून छेडछाड, लैंगिक छळ आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा सामना करावा लागला. या घटना इतक्या भयावह होत्या की तिच्या मनावर याचा खोलवर परिणाम झाला होता.

पार्वतीने स्वत: या पॉडकास्टमध्ये सांगितले की, रस्त्यावरुन जात असताना अनेक पुरुषांनी तिला प्रायवेट पार्ट दाखवले होते. लहानपणी हे नेमकं काय सुरु आहे हे पार्वतीला कळाले नाही. पण नंतर जेव्हा हळूहळू या घटनांचा अर्थ समजायला लागल्यावर तिच्या मनावर परिणाम होऊ लागला.

"किती तरी वेळा मी रस्त्यावरुन जात असताना पुरुषांनी मुद्दाम माझ्याकडे पाहात प्रायव्हेट पार्ट दाखवले आहेत. त्या वेळी मला काय होतंय हे समजतच नव्हते," असे पार्वतीने सांगितले. नंतर मोठी झाल्यावर तिला या सर्व घटनांचा तिच्या शरीरावर आणि मनावर किती खोल परिणाम झाला हे समजले.

पार्वती थिरुवोथु मल्याळम, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. 'टेक ऑफ', 'चार्ली', 'उयिरे', 'करीब करीब सिंगल', 'मरियन', 'बंगलोर डेज' यांसारखे अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये तिने काम केले असून तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सध्या ती 'द स्टॉर्म' या वेब सीरिजसाठी शुटिंग करत आहे.