Pooja Bhatt: त्या शूटसाठी पूजा भट्टने कपडेच घातले नाहीत, थेट अंगावर… कित्येक वर्षांनंतर दिली कबूली

Pooja Bhatt photoshoot: नुकताच बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टने एका मुलाखतीमध्ये प्रचंड गाजलेल्या एका फोटोशूटविषयी सांगितले आहे. तिने हे फोटोशूट विना कपडे केल्याचा अनेकांनी दावा केला होता. पण आता पूजाने या फोटोशूट मागितल सत्य सांगितले आहे.

| Updated on: Jun 01, 2026 | 12:10 PM
1 / 6
90 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून पूजा भट्ट ओळखली जाते. ती एक चित्रपट निर्माती असून तिने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. तिचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर असायचे. पूजा भट्ट तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. पूजा भट्टने एक न्यूड फोटोशूट केले होते. हे फोटोशूट त्याकाळी चांगलेच चर्चेत होते. कारण या फोटोशूटमध्ये पूजा भट्टने कपडे घातले नव्हते. आता कित्येक वर्षांनंतर पूजा भट्टने या फोटोशूटबाबत खुलासा केला आहे.

2 / 6
नुकतेच विक्की लालवानी यांना दिलेल्या एका मुलाखतीत पूजा भट्टने सांगितले की, या फोटोशूटची कल्पना तिला पत्रकार दिनेश रहेजा आणि प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांच्याकडून मिळाली होती.

3 / 6
पूजा भट्ट फोटोशूट विषयी बोलताना म्हणाली की, 'एकीकडे मला या फोटोसाठी खूप टीकेला सामोरे जावे लागले आणि दुसरीकडे लोकांचे खूप प्रेमही मिळाले. पण माझ्यासाठी हे कधीच वाद निर्माण करणारे फोटोशूट नव्हते. दिनेश रहेजा, ज्यांचा मी आजही खूप आदर करते, त्यांनी मला डेमी मूरच्या व्हॅनिटी फेअर मॅगझिन कव्हरचा फोटो दाखवला होता. मला ते कव्हर खूपच शानदार वाटले होते. त्यानंतर दिनेश आणि जीतू माझ्याकडे आले आणि म्हणाले की त्यांना असेच काहीतरी करायचे आहे. त्यांनी मला विचारले की तू तयार आहेस का आणि मी लगेच होकार दिला. जेव्हा मी विचारले की बॉडी पेंटिंग कोण करेल, तेव्हा त्यांनी सांगितले की अण्णा सिंग हे काम करतील'

4 / 6
पूजा भट्टने सांगितले की, 'त्या दिवशी रात्री साडे नऊच्या सुमारास माझे काम संपले आणि मग मी जगदीश माळी यांच्या घरी गेले. तिथे माझे बॉडी पेंटिंग झाले आणि फोटोशूट झाले. शूट संपल्यानंतर मी हे पूर्णपणे विसरून गेले होते, पण जेव्हा मॅगझिन बाजारात आले तेव्हा एकच खळबळ माजली होती.'

5 / 6
तिने पुढे सांगितले की, 'मॅगझिन रिलीज होताच सर्वत्र चर्चा सुरू झाल्या होत्या. पण त्याच दरम्यान शहरात एक अत्यंत दुःखद घटना घडली. बॉम्बस्फोटांसारख्या भयंकर शोकांतिकेने लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधून घेतले होते. साहजिकच त्या वेळी लोकांकडे एका महिलेच्या बॉडी पेंट फोटोशूटपेक्षा जास्त गंभीर मुद्दे होते.'

6 / 6
तिने सांगितले, 'मी त्या फोटोमध्ये न्यूड नव्हते. डेमी मूरच्या कव्हरमध्ये 'बर्थडे सूट'चा अर्थ असा होता की ती पेंटच्या खाली कपड्यांशिवाय होती. पण माझ्याबाबतीत तसे नव्हते. मी अंडरवेअर घातले होते. आम्हाला चांगलीच माहिती होती की आमची मर्यादा काय आहे आणि ती मी ओलांडली नाही.'

Follow Us