
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्येही फेमस आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी रविवारी अमेरिकेत त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. दिवाळी पार्टीतील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

या सेलिब्रेशनसाठी प्रियांका आणि निक दोघेही ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये दिसले. निकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. यासोबत त्याने लाईट पिंक कलरचे, एम्ब्रॉयडरी असलेले जॅकेट परिधान केले होते. पारंपारिक पोशाखात निक छान दिसत होता.

तर प्रियांकाच्या लूकमुळे सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. प्रियांकाने लाल रंगाचा मायक्रो वेल्वेट ब्लाउज आणि गोल्डन लेहेंगा घातला होता. तिने बनसह तिचा लूक पूर्ण केला. पण तिचा मेकअप थोडा ड्रॅमॅटिक होता, ज्याकडे बऱ्याच जणांचे लक्ष वेधले गेले.

प्रियांका आणि निकची ही देसी स्टाईल चाहत्यांना तर आवडतेच पण चाहत्यांनी अभिनेत्रीच्या मेकअपवरही कमेंट केल्या. काहींना तिचा हा लूक फारसा आवडला. नसल्याचे दिसून आले.

कामाबद्दल बोलायचं झालं तर प्रियांका नुकतीच MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. तिचे अमेझिंग लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले .