
अभिनेत्री रवीना टंडन हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. रवीना टंडनचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. रवीनाची लेक राशा थडानी लवकरच बॉलिवूडमध्ये धमाका करणार आहे.

आता नुकताच रवीना टंडन आणि राशा या विमानतळावर स्पॉट झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोघींचा जबरदस्त असा लूक बघायला मिळाला. मायलेकीची जोडी लोकांना आवडलीये.

पापाराझी यांना फोटोसाठी खास पोझ देताना देखील रवीना टंडन आणि राशा दिसल्या. ऑल ब्लॅक लूकमध्ये रवीना आणि राशा या दोघीही दिसल्या.

आता दोघींचे विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लोक यांच्या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

अनेकांनी या फोटोवर कमेंट करत म्हटले की, राशा सेम टू सेम रवीना हिच्यासारखीच दिसते. राशा थडानी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते.