सागरिका घाटगे हिने शेअर केले कोल्हापुरच्या राजघराण्यातील कार्यक्रमातील खास फोटो, पती झहीर खान..
सागरिका घाटगे हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. काही दिवस डेट केल्यानंतर अभिनेत्रीने भारतीय क्रिकेटर झहीर खान याच्यासोबत लग्न केले. अनेक वर्ष त्यांनी आपल्या नात्याची साधी भनकही कोणाला लावू दिली नाही. सागरिका घाटगे हिचा कोल्हापूर राजघराण्याशी संबंध आहे.

अभिनेत्री सागरिका घाटगे हिचा छोटा भाऊ शिवजीत घाटगे याचे लग्न 16 नोव्हेंबर 2026 रोजी थाटात पार पडले. यादरम्यानच या लग्नातील अनेक फोटो पुढे आली. सागरिका घाटगे पती झहीर खान आणि मुलासोबत लग्नात होती.
सागरिका घाटगे ही कोल्हापूरच्या राजघराण्याची मुलगी आहे. त्यातच कोल्हापूरमधील घरी भावाच्या लग्नानंतर कार्याला सागरिका पोहोचली. यावेळी तिने फोटोतून शाही थाट नक्की कशाला म्हणतात हे दाखवून दिले.
एका फोटोत पारंपारिक पोशाख सागरिकाच्या मुलाने घातला आहे. फतेहसिंह खान मामाच्या मांडीवर बसल्याचे दिसत आहे. यासोबतच पार्टीतील फोटोही सागरिकाने शेअर केला.
गार्डनमध्ये खास सजावट करण्यात आली. जेवणाची खास मेजवाणी यावेळी दिसत आहे. यादरम्यान एक काैटुंबिक फोटोही सागरिका घाटगेने शेअर केला. यात महिला पारंपारिक दागिने घातलेल्या दिसत आहेत.
सध्या सागरिका घाटगेचे हे फोटो तूफान व्हायरल होत आहेत. शाही जेवण आणि खास मेजवाणी या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे. राजेशाही थाट नक्की कशाला म्हणतात हे दिसतंय. सागरिका हिने भारतीय क्रिकेटर झहीर खान याच्यासोबत लग्न केले.