Marathi News Photo gallery Actress Saif Ali Khan sister Soha Ali Khan has made a very big revelation marathi News
सोहा अली खान हिचा मोठा खुलासा, म्हणाली, पतौडी पॅलेसमधील प्रत्येक…
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत असतो. सैफ अली खान नेहमीच खास वेळ पतौडी पॅलेसमध्ये घालवताना दिसतो. पतौडी पॅलेस हे अत्यंत आलिशान आहे. सैफ अली खानने खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.
Follow us
अभिनेता सैफ अली खान हा कामातून वेळ काढून पतौडी पॅलेसमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो. पतौडी पॅलेस हे अत्यंत आलिशान असून ते अत्यंत मोठे आहे.
नुकताच पतौडी पॅलेसबद्दल सैफ अली खान याची बहीण सोहा अली खान हिने मोठा खुलासा केलाय. सोहा अली खान म्हणाली की, सर्वजण मिळून पतौडी पॅलेसची काळजी घेतात.
सोहा अली खान म्हणाली की, माझी आई आजही प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवते. तिला किती खर्च होत आहे आणि काय नाही हे सर्व माहिती असते.
काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान हा आपल्या कुटुंबासोबत पतौडी पॅलेसमध्ये खास वेळ घालवताना दिसला. पतौडी पॅलेसमधील फोटो करिना कपूरने शेअर केले.
एका फोटोमध्ये सैफ अली खान हा बाहेर बसून नाश्ता करताना दिसला. सैफ अली खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.