
सयानीने एक किस्सा सांगितला, जेव्हा डायरेक्टर कट बोलल्यानंतरही सहकलाकार किसींग करतच होता. त्याने किस बंद केली नाही. यामुळे ती खूप अनकंफर्टेबल झालेली.

इंटीमेट सीन्स दरम्यान काय आव्हान असतात, त्या बद्दल सयानी बोलली. इंटीमेसी कॉर्डिनेटर्सबद्दलही तिने आपलं मत मांडलं. सयानी म्हणाली की, मी इंटीमेसीवर पुस्तक लिहू शकते. आनंद या गोष्टीचा आहे की, भारतात आता इंटीमेसी कॉर्डिनेटर प्रोफेशनचा भाग बनलाय.

इंटीमेट सीन्स करणं सोपं असतं. कारण ते टेक्निकल असतात. पण काही लोक याचा फायदा उचलतात. मी स्वत: या स्थितीचा सामना केलाय. डायरेक्टर कट बोलल्यानंतरही अभिनेत्याने किस बंद केलं नाही. हे असं वागण अशोभनीय आहे. तुम्ही अनकंफर्टेबल होता.

सयानीने फोर मोर शॉट्सच्या गोव्यामध्ये शूट झालेल्या आऊटडोर शूटचा उल्लेख केला. त्यात तिला छोटा ड्रेस घालून बीचवर झोपायचं होतं. माझ्यासमोर 70 लोक उभे होते. मला शॉल देईल असा सेटवर एक व्यक्ती नव्हता. कोणीही माझ्यासोबत नव्हतं.

सयानीने 2012 साली 'सेकंड मॅरेज' चित्रपटातून डेब्यु केला. 'मार्गरीटा विद ए स्ट्रॉ' चित्रपटाद्वारे तिला ओळख मिळाली. ती अनेक वेब सीरीज आणि चित्रपटात दिसली होती.