महाराष्ट्राची क्रश, शिवालीच्या नवीन लुकवर चाहते फिदा, हटके पोज पाहून सर्वच थक्क

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परबच्या बॅकलेस सिल्व्हर गाऊनमधील फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष. पोज पाहून चाहते थक्क.

| Updated on: Sep 11, 2026 | 5:49 PM
1 / 5
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब हिने आपल्या अभिनयाने आणि दिलखुलास अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब हिने आपल्या अभिनयाने आणि दिलखुलास अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.

2 / 5

अभिनयासोबतच शिवाली सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. नुकतेच तिने शेअर केलेले काही ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

3 / 5

या फोटोंमध्ये शिवाली सिल्व्हर रंगाच्या चमकदार डिझायनर कट-आऊट गाऊनमध्ये दिसत आहे. सिक्विन वर्क असलेल्या या गाऊनमुळे तिच्या लूकला रॉयल आणि ग्लॅमरस टच मिळाला आहे.

4 / 5

बॅकलेस डिझाइनमुळे तिचा हा लूक आणखी आकर्षक दिसत आहे. शिवालीने या गाऊनसोबत गळ्यात सुंदर डिझायनर चोकर आणि हातात स्टायलिश ज्वेलरी परिधान केली आहे.

5 / 5

तर कुरळ्या केसांची हेअरस्टाइल तिच्या लूकला चारचाँद लावत आहे. हे फोटो शेअर करताना शिवालीने ‘Her lips have made me her prisoner’ असं लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us