तु तर महाराष्ट्राची क्रश पण.., शिवाली परबच्या नव्या लुकवर चाहते फिदा, सौंदर्याने..
कपाळी चंद्रकोर आणि नथीचा नखरा, शिवालीच्या नवीन लुकवर चाहत्यांच्या नजरा. साडीमधील सौंदर्य पाहून सर्वच थक्क.
1 / 5

अभिनयासोबतच विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री शिवाली परब सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत असते.
2 / 5
विविध लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. नुकताच शिवालीने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
या फोटोशूटमध्ये शिवालीने मरून आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनची आकर्षक साडी नेसली आहे. या साडीला असलेली चमकीदार सिक्विन बॉर्डर आणि सुंदर डिझाईन तिच्या लूकला खास बनवत आहे.
4 / 5
त्यावर तिने डिझायनर ब्लाऊज परिधान केला असून, तिचा हा पारंपरिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. साडीला साजेशा दागिन्यांनी शिवालीने आपला लूक आणखी खास बनवलं आहे.
5 / 5
गळ्यात नाजूक सोन्याची साखळी, कानात सुंदर झुमके, नाकात मोत्यांची नथ आणि कपाळावर चंद्रकोर असा तिचा लूक पाहायला मिळत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us