
अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. सोनम पती आनंद आहुजा सोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहे. गरोदरपणाच्या काळात सोनमने अनेकदा ग्लॅमरस फोटो आपल्या चाहत्यांच्या सोबत शेअर करत असते.

लंडनमध्ये मोठ्या दिमाखात नुकताच अभिनेत्री सोनम कपूरचा बेबी शॉवर सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सोनमच्या बेबी शॉवरमध्ये या कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यासाठी या जोडप्याने खास तयारी केली होती. पाहुण्यांसाठी खास मेन्यू तयार करण्यात आला होता.

सोनम कपूरची बहीण रिया कपूरही या बेबी शॉवरसाठी उपस्थित होती. 'बहुतही प्यारा बेबीशॉवर था' असे कॅप्शन देत तिनेही आपल्या सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत .

या बेबी शोवरमध्ये सोनमने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. या लुकमध्ये गरोदर अवस्थेतील ग्लो सोनमच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत.

सोनमच्या बेबी शॉवरमध्ये ब्रिटिश-पाकिस्तानी गे सिंगर, सॉन्ग राइटर, मॉडल , म्यूजिक कम्पोजर लिओ कल्याणही ही उपस्थित होते. त्यांनी यावेळी सोनमनेने काम केलेल्या चित्रपटातील गाण्यासह इतर गाण्याचेही सादरीकरण केले.

a spice girl in bollywood. i just performed at sonam kapoor’s baby shower ? what is life? असे कॅप्शन देत गे सिंगर लिओ कल्याण यांनी सोनामाबरोबरचा फोटो शेअर केला आहे.