स्वत:ची कार विकून ही अभिनेत्री मुंबईत चालवतेय रिक्षा, ‘टुकटुक राणी’ म्हणून आहे लोकप्रिय
मराठी इंडस्ट्रीमधील अशी एक अभिनेत्री जिने तिची कार विकून खरेदी केली रिक्षा. आता चालवते रिक्षा. टुकटुक राणी म्हणून आहे सर्वत्र लोकप्रिय. कोण आहे ती?

मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री यशश्री मसुरकर हिची वेगळीच ओळख आहे. अभिनयासोबतच ती मुंबईच्या रस्त्यांवर स्वतः रिक्षा चालवते.

काही वर्षांपूर्वी तिने आपली कार विकून रिक्षा खरेदी केली आणि त्यानंतर ती स्वतः रिक्षा चालवताना दिसते. तिच्या या अनोख्या अंदाजामुळे तिला ‘टुकटुक रानी’ म्हणूनही ओळख मिळाली.

यशश्रीला रिक्षा चालवण्याची कल्पना तिच्या डेन्मार्कच्या एका मित्रामुळे सुचली. तिचा मित्र सायकलवरून भारतात आला होता. त्याचा हा प्रवास तब्बल 500 दिवसांचा होता. त्याच्याकडून प्रेरणा घेत यशश्रीने रिक्षातून मुंबई ते आग्रा असा प्रवासही केला.

एका मुलाखतीत यशश्रीने सांगितलं होतं की, ती रिक्षातून केवळ प्रवासी घेऊन जात नाही तर ऑडिशन आणि शूटिंगसाठीही रिक्षानेच प्रवास करते.

यशश्री मसुरकरने ‘लक्ष्मण रेषा’ या मराठी मालिकेत काम केलं आहे. त्यानंतर ती ‘रंग बदलती ओढणी’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्य’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही झळकली.