
स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी ही आपल्या शरीरासाठी हिवाळ्यात म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात चांगली असते. हिवाळ्यात, आपल्या शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता भरून काढायची असेल तर त्यासाठी आहारात (Diet) स्ट्रॉबेरीचा समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे. Webmd च्या वृत्तानुसार, स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आरोग्यास खूप चागंले फायदे होतात.

काय आहेत स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे? - स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन आणि फायबरचं प्रमाण मोठ्या असतं. यामध्ये पॉलिफेनोल्स नावाच्या अँटी-ऑक्सिडेंट देखील असतात. स्ट्रॉबेरीमध्ये सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसून कमी कॅलरीयुक्त पदार्थ असतात.

- यात मॅंगनीज, पेटासियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 9 सर्वकाही असतं.

- इतकंच नाही तर हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करतं. म्हणूनच हंगामात स्ट्रॉबेरी खाणं महत्त्वाचं आहे.

- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्ट्रॉबेरी कुठल्याही प्रकारे खाऊ शकता.