
जोस बटलरला दुसरा नवरा म्हणून स्वीकारल्याचं लारा वॅन डर डुसेने वक्तव्य केल्याने ती चर्चेत आली आहे. ही लारा वॅन डर डुसे कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

लारा वॅन डर डुसे ही दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू रासी वॅन डर डुसेची बायको आहे. प्रेक्षक स्टँडमध्ये ती नेहमी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करताना दिसते.

आता लारा वॅन डर डुसेने जोस बटलरला दुसरा नवरा म्हणून स्वीकारल्याच वक्तव्य का केलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

जोस बटलर जेव्हा मोठे फटके खेळतो किंवा एखादा रेकॉर्ड करतो, तेव्हा कॅमरा प्रेक्षक स्टँडमध्ये बसलेल्या कुटुंबियांच्या सदस्यांकडे जातो. त्यावेळी अनेकांना लारा वॅन डर डुसे जोस बटलरची बायको वाटते.

राजस्थान रॉयल्सच्या पॉडकास्टमध्ये बोलताना लाराने हा गोंधळ दूर केला, गमतीने तिने यावेळी जोसला दुसरा नवरा म्हणून स्वीकारल्याचं सांगितलं.

लारा वॅन डर डुसेकडे मोहात पाडणारं सौदर्य आहे. बॉलिवूडच्या अनेक सौंदर्यवान अभिनेत्री काही जणांना तिच्यासमोर फिक्या वाटू शकतात.

रासी वॅन डर डुसे राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. फेब्रुवारीत झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला 1 कोटी रुपयांना विकत घेतलं.

रासी वॅन डर डुसेला या सीजनमध्ये राजस्थानकडून फारशी संधी मिळाली नाही. पण लारा डुसे प्रेक्षक स्टँडमध्ये राजस्थानच्या अन्य क्रिकेटपटुंच्या पत्नींसोबत दिसते.

जोस बटलरने मोठा फटका खेळला किंवा शतक झळकावलं तर कॅमेरा तिच्याकडे जातो. त्यामुळे रासी वॅन डर डुसे सर्वांना जोस बटलरची बायको वाटते.

मागच्याच आठवड्यात बटलरची पत्नी आणि मुलं बायो-बबलमध्ये दाखल झाली. काल क्वालिफायर 2 च्या महत्त्वाच्या सामन्यात जोस बटलरने शतकी खेळी केली.