अॅडव्हेंचरस सेक्स किंवा साहसी पद्धतीने शारीरिक संबंध ठेवण्याविषयी अनेक युगुलांमध्ये उत्सुकता वाढत आहे. मात्र पुरेशी काळजी न घेता केलेले सेक्स महिलेच्या जीवावर बेतल्याचा प्रकार समोर आला.
ब्रिटनमध्ये मद्यधुंद अवस्थेत पतीने अॅडव्हेंचरस सेक्स केल्याने पत्नीला प्राण गमवावे लागले. पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरवत बेजबाबदार पतीला न्यायालयाने सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे
52 वर्षीय वॉरेन मार्टिन कॉल्टन आपली 38 वर्षीय पत्नी क्लेअर व्हाईटसह एका अलिशान रिसॉर्टला गेले होते. साहसी शरीर संबंध ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी सोबत ग्लोव्हज, रेड टेप अशी सामुग्रीही बाळगली होती.
सेक्स करताना मार्टिन यांनी पत्नीला खुर्चीवर बांधलं. तिच्या तोंडात मोजा कोंबला. मद्यधुंद अवस्थेत असल्याने मार्टिनचा त्याचवेळी डोळा लागला. पत्नीला आपण खुर्चीला बांधलं असून तिच्या तोंडात मोजा आहे, याचाही त्याला विसर पडला.
श्वास गुदमरल्यामुळे क्लेअरचा त्याच अवस्थेत मृत्यू झाला. सकाळी उठल्यावर त्याला पत्नी मृत्युमुखी पडल्याचं भान आलं. तोपर्यंत खूप उशीर झाल्याने मार्टिनकडे पश्चातापाशिवाय काही उरलं नव्हतं.
अशाच प्रकारची घटना काही दिवसांपूर्वी नागपुरात घडली होती. त्यावेळी तरुणाला प्राण गमवावे लागले होते, तर महिलेला पोलिसांनी अटक केली होती.