Afghan Women Protesters : अफगाण महिलांनी तालिबानच्या विरोधात उठवला आवाज, म्हणाल्या ‘तुम्ही आमच्या मुलींना शाळेत जाऊ दिलं तर आम्ही बुरखाही घालू…’

| Updated on: Sep 03, 2021 | 3:17 PM

एक आंदोलक फरेश्ता ताहेरी, म्हणाल्या, 'आम्ही आमच्या हक्कांसाठी येथं जमलो आहोत. आम्ही बुरखा घालण्यास तयार आहोत, परंतु मुलींना शाळेत जाऊ द्यावं आणि महिलांना काम करू द्यावं अशी आमची इच्छा आहे.' (Afghan Women Protesters: Afghan women raise their voices against the Taliban, saying, "If you let our girls go to school, we will wear the burqa.")

1 / 6
अफगानिस्तानात पुन्हा एकदा महिलांनी तालिबानचा विरोध केला आहे. तालिबान राजवटीत त्यांच्या मुलींना शाळेत जाण्याची परवानगी असेल तर ते बुरखा घालण्यास तयार असल्याचं या महिलांनी म्हटलंय.

2 / 6
अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील हेरात शहरात सुमारे 50 महिलांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. या दरम्यान, त्यांनी हातात शाळेत जाण्याची मागणी करणारे फलक घेतले होते. आंदोलन करणाऱ्या महिलांनी 'शिक्षण, काम आणि सुरक्षा मिळवणं हा आमचा हक्क आहे' अशा घोषणा दिल्या.

3 / 6
एक आंदोलक फरेशता ताहेरी, म्हणाल्या, 'आम्ही आमच्या हक्कांसाठी येथं जमलो आहोत.' त्या पुढे म्हणाल्या, "आम्ही बुरखा घालण्यास तयार आहोत, परंतु मुलींना शाळेत जाऊ द्यावं आणि महिलांना काम करू द्यावं अशी आमची इच्छा आहे."

4 / 6
तालिबानच्या पहिल्या बळी ह्या महिला ठरतायत. त्यातही काम करणाऱ्या महिला टार्गेटवर आहेत

5 / 6
इराणच्या सीमेजवळील हेरात हे अफगाणिस्तानातील इतर पुराणमतवादी केंद्रांमध्ये अपवाद ठरलं आहे. येथे काही स्त्रिया आधीपासूनच बुरखा परिधान करत आल्या आहेत. तालिबाननं म्हटलं आहे की त्याचे सरकार सर्वसमावेशक असेल, मात्र नवीन सरकारमध्ये महिलांच्या सहभागाबद्दल लोकांना शंका आहे.

6 / 6
तालिबानविरोधी रोष काबूलमध्ये पहायला मिळतोय, पाकिस्तान मुर्दाबादचे नारेही ऐकायला येतायत