दुसऱ्याची बायको पळवा, थाटात करा लग्न, इथं अजब परंपरेचा उत्सव; नेमकं काय घडतं?

जगात लग्नासाठी वेगवेगळ्या परंपरा आहेत. एक परंपरा तर फारच अजब आहे. तेथे महिलेला एखादा पुरुष आवडला तर तिचे तिला आवडणाऱ्या पुरुषासोबत थाटात लग्न लावून दिले जाते.

| Updated on: Dec 18, 2025 | 9:18 PM
1 / 5
जगभरात लग्नाविषयी अनेक परंपरा आहेत. चीनमध्ये एका जमातीमध्ये मुलीचे लग्न होण्यापूर्वी तिचे दोन दात पाडले जातात. मुलीचा मामा हातोडा घेऊन लग्नासाठी वयात आलेल्या आपल्या भाचीचे दात पाडतो. भारतातही लग्नासाठी अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात.

2 / 5
सध्या मात्र एक अजब परंपरा समोर आली आहे. या प्रथेची आता जगभरात चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही परंपरा पश्चिम आफ्रिकेत राहणार्या वोदाब्बे जमातीत पाळली जाते. या जमातीत पहिले लग्न हे कोणासोबत करायचे हे कुटुंब ठरवते. परंतु दुसरे लग्न करायचे असेल तर इथे एक अजब प्रथेचं पालन केलं जातं.

3 / 5
दुसऱ्या लग्नासाठीचे नियम पूर्णपणे बदलतात. पुरुष जर दुसऱ्याच्या पत्नीला आकर्षित करण्यात यशस्वी झाला तर संबंधित स्त्री आणि पुरुषाचे थाटात लग्न लावून दिले जाते. विशेष म्हणजे अशा लग्नाला तेथील समाजात कोणताही विरोध केला जात नाही. उलट या लग्नाची जबाबदारी वोदाब्बे जमातीतील लोकच पार पाडतात.

4 / 5
वोदाब्बे जमातीत गेरेवोल नावाचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात नाच-गाणे असते. सोबतच या उत्सवात आपल्या प्रेमाची आणि पसंदीची परीक्षा घेतली जाते. या उत्सवात पुरुष तोंडाला कलर लावतात. डान्स करतात. आपल्याला आवडणाऱ्या महिलेला ते आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. यातून संबंधित महिला आकर्षित झाली तर त्या दोघांचे थाटात लग्न लावून दिले जाते.

5 / 5
या उत्सवात एखाद्या महिलेला पतीला सोडून अन्य पुरुषासोबत लग्न करायचे असेल तर तिच्या या निर्णयाचे स्वागत केले जाते. या उत्सवात एकमेकांच्या पसंतीला खुलेपणाने स्वीकारले जाते. बाहेर अशा प्रथेला वाईट मानले जाते. परंतु वोदाब्बे या जमातीत या प्रथेच्य माध्यमातून महिलांच्या आवडीचा सन्मान केला जातो.