
‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सध्या चांगलेच गाजत आहे. या शोमध्ये अमरावतीची रॅपर आर्या जाधवने निकी तांबोळीच्या कानशिलात मारली. त्यानंतर तिला थेट शोमधून घरचा रस्ता दाखवण्यात आला.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आर्या जाधव ही अमरावती शहरात दाखल झालीये. यावेळी आर्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. आर्याला भेटण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली.

आर्याने रॅप करत आपली एक झलक दाखवली व रॅली काढून तिचे अमरावतीकरांनी जोरदार स्वागत केले. आता याचेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

आर्या जाधव ही बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसली. मात्र, निकी तांबोळीला मारल्यामुळे तिला थेट घराच्याबाहेर काढण्यात आले. रितेश देशमुख या सीजनला होस्ट करतोय.

विशेष म्हणजे बिग बॉसचे हे पाचवे सीजन धमाकेदार कामगिरी करताना देखील दिसत आहे. आता लवकरच बिग बॉस मराठीचा फिनाले पार पडेल.