Melody: मेलोडी खाओ… मोदी यांनी दिले गिफ्ट जॉर्जिया मेलोनींना, इकडं फायदा झाला भलत्याच कंपनीला … झरझर पळाला Parle इंडस्ट्रीजचा शेअर

Parle Industries Share: देशातील FMCG बाजारातील दिग्गज कंपनी पारले आज प्रकाशझोतात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना चॉकलेट गिफ्ट दिले. पण दुसरीकडे या कंपनीच्या नामसाधर्म्य असलेल्या पारले इंडस्ट्रीजच्या शेअरला अप्पर सर्किट लागले.

| Updated on: May 20, 2026 | 5:55 PM
1 / 6
Parle Industries Share: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मेलोडी टॉफीचं गिफ्ट दिल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. याचा फायदा पारले कंपनीचे नामसाधर्म्य असलेल्या पारले इंडस्ट्रीजच्या शेअरला झाला. या कंपनीच्या शेअरने मोठी उडी घेतली.

Parle Industries Share: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मेलोडी टॉफीचं गिफ्ट दिल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. याचा फायदा पारले कंपनीचे नामसाधर्म्य असलेल्या पारले इंडस्ट्रीजच्या शेअरला झाला. या कंपनीच्या शेअरने मोठी उडी घेतली.

2 / 6

मेलोडी चॉकलेट लोकप्रिय आहे. पारले प्रॉडक्ट्स कंपनी ही एफएमसीजीमधील दिग्गज कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. पारले-जी, मोनॅको, हाईड अँड सीक, मँगो बाईट यासारखी लोकप्रिय उत्पादनं याच कंपनीची आहे. पण पारले प्रॉडक्ट्स कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध नाही.

3 / 6

तर पारले या कंपनीशी नामसाधर्म्य असलेली पारले इंडस्ट्रीज ही BSE वर सूचीबद्ध कंपनी आहे. ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहे. पारले इंडस्ट्रीज ही कंपनी कागद आणि त्याचा पुनर्वापर या उद्योगातही मोठा वाटा आहे. पण पारले इंडस्ट्रीज या कंपनीचा पारले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडशी कोणताही संबंध नाही.

4 / 6

पारले इंडस्ट्रीजचा शेअर आज एकाएक परदेशातील घडामोडीमुळे चर्चेत आला. हा आज स्टॉक 5 टक्क्यांनी वाधरला. त्याला अप्पर सर्किट लागले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कंपनीचा शेअर दबावाखाली आहे. वार्षिक आधारावर हा शेअर 40 टक्क्यांनी तर गेल्या 12 महिन्यात हा शेअर 68 टक्क्यांनी घसरला आहे.

5 / 6

कंपनीच्या नामसाधार्म्यामुळे हा घोळ झाला आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी पारले इंडस्ट्रीजच्या शेअरची खरेदी केली. हा पेनी शेअर आज 5.25 रुपयांवर बंद झाला. या कंपनीचा मेलोडी चॉकलेट तयार करणाऱ्या पारले प्रॉडक्ट्स कंपनीशी कोणताही संबंध नाही. पण पारले नामसाधर्म्याचा तिला फायदा झाला. आज या शेअरला अप्पर सर्किट लागले.

6 / 6

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us