
करीना कपूर हिच्या कारकिर्दीला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. जवळपास अडीच दशके करीना कपूर हीने बॉलीवूडमध्ये केवळ गुडी गुडी भूमिकाच केल्या नाहीत तर वेळ प्रसंगी आपल्यातील टॅलेन्ट देखील दाखवून दिले आहे.

बॉलीवूडचे कसलेले दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी शेक्सपिअरच्या ओथेल्लोवर बेतलेला 'ओमकारा' चित्रपटात डेसडेमोनाचा रोल करीनाला दिला तेव्हा तिने जीव ओतून अभिनय केला.

'ओमकारा' चित्रपटात अजय देवगण याच्या सोबत करीना आणि लंगडा त्यागी हे कॅरेक्टर सैफ अली खान पतौडी याने साकारले आहे. सैफने याने या चित्रपटात आपण एका अभिनेत्रीच्या पोटी जन्म घेतला आहे हे या चित्रपटात सिद्ध केले होते.

करीना कपूर हीने तिला मिळालेल्या रोलमध्ये उत्तम अभिनय केला होता. त्यामुळे तिने मणि रत्नम आणि बॉलिवूडचे इतर बड्या मंडळींसाठी खास ओमकाराच्या प्रदर्शन पूर्व शोचं आयोजन केलं होतं.

या शोला मणि रत्नम आणि कोंकणा सेन शर्मा, विवेक ओबेरॉय अशी बरीच मंडळी आली होती.तिला अपेक्षा होती आपल्या अभिनयाचे कौतुक होईल आणि त्यासाठीच तिने या खास शोचं आयोजन केले होते. परंतु झाले उलटेच....

आपल्याला सर विल्यम शेक्सपियरच्या ऑथेलो (c.1601-1604)या नाटकातील एक पात्र'डेसडेमोना'हे पात्र नीट जमले आहे की नाही यासाठी करीना हिला जामच उत्सुकता होती, घडलं भलतंच असं करीना हसत म्हणाली.

ज्यावेळी चित्रपटाचा मध्यंतर झाला तेव्हा सर्व जणांच्या प्रतिक्रिया ऐकून तिचा थोडा हिरमोड झाला. सर्वच जण म्हणत होते, तू छान काम केलंस, पण सैफने हॅज डन फॅब्युलस जॉब ...असे एका मुलाखतीत करीना कपूर हीने म्हटलं आहे.

'ओमकारा' चित्रपट साल २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता.या चित्रपटानंतर काही वर्षांनी सैफ आणि करीना यांनी लग्नं केलं, त्यांना दोन मुलं आहेत. सैफने फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझे 'ओमकारा' आणि 'असोका' हे दोन्ही चित्रपट पाहिले होते असे तिने मुलाखतीत सांगितले.