
आचार्य चाणक्यांच्या मते सकाळची वेळ खूप महत्वाची आहे. सकाळची वेळ व्यर्थ वाया घालवू नका. सकाळी लवकर उठून त्या गोष्टी करा, ज्याद्वारे तुम्ही स्वतःला दिवसभराच्या कामासाठी तयार करू शकता आणि पूर्ण उर्जेने त्या गोष्टी योग्य पद्धतीने करू शकता. यश मिळविण्यासाठी योग्य दिशेने आणि योग्य मार्गाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आचार्या चाणक्य यांचे मत होते. तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर सकाळी उठून आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 गोष्टी करा.

आचार्यांचा असा विश्वास होता की या जगातील सर्वात मोठा शाप म्हणजे गरिबी आहे. जर तुम्ही गरीब असाल तर कष्ट करा आणि गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करा कारण या जगात निर्धन माणसाला कोणत्याही प्रकारचे सुख मिळवण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे मेहनत करा आणि परिस्थिती बदला.

आचार्य चाणक्य यांनी दानधर्माला फार महत्त्व दिले आहे. आचार्य म्हणायचे की, जगात जो माणूस भिकाऱ्याला दान देत नाहीत ते अत्यंत निर्दयी असतात. कारण गरिबी अधीच लोकांना जीवंतपणी मारते. अशा लोकांना गरीब आणि गरजू लोकांच्या वेदना ज्यांना समजत नाहीत ते आधीच मेले असतात.

वाईट सवयी असलेल्या, चुकीच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. अशी लोक तुम्हाला ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीत आल्याने तुमच्या मान संन्मानालाही ठेच पोहचू शकते.

तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल, तर तुमचे इरादे मजबूत ठेवा. रोज सकाळी उठून स्वतःला सांगा की तुम्ही हे काम करू शकता. त्यामुळे ते काम करण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल.