Airtel : 12 महिन्यांचं टेन्शन मिटलं, एअरटेलच्या स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांची मज्जा
Airtel Recharge Plan : एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी टेलिकॉम कंपनी असून, आपल्या ग्राहकांसाठी कंपनीकडे विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. एअरटेलकडे असा एक प्लॅनही आहे ज्यामुळे ग्राहकांची पूर्ण वर्षभरासाठीची मोठी चिंता दूर होणार आहे.

देशभरात सुमारे 41 कोटींहून अधिक लोक एअरटेलचे सिम वापरतात. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये अनेक आकर्षक प्लॅन्सचा समावेश केला आहे.

तुम्ही महागड्या रिचार्ज प्लॅन्समुळे त्रस्त असाल, तर आता तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. एअरटेलने कोट्यवधी ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन सादर केला आहे.

एअरटेलच्या या प्लॅनची किंमत फक्त 1849 रुपये आहे. या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना तब्बल 365 दिवसांची वैधता देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्ण एक वर्षासाठी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

एअरटेलचा हा प्रीपेड प्लॅन विशेषतः अशा ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे ज्यांना फक्त कॉलिंगसाठी स्वस्त प्लॅन हवा आहे. हा एक ‘व्हॉइस ओन्ली’ प्लॅन असल्यामुळे यात इंटरनेट डेटाची सुविधा दिली जात नाही.

तुम्हाला जर इंटरनेट डेटासह स्वस्त प्लॅन हवा असेल, तर तुम्ही एअरटेलचा 2249 रुपयांचा प्लॅन निवडू शकता. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि आवश्यक कामांसाठी एकूण 30 GB डेटा दिला जातो.