AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

145 किमी वेग असणाऱ्या चक्रि‍वादळाचा कहर, निसर्ग कोपल्याने लाखो लोक संकटात; अलर्ट जारी

Typhoon Noul : नोल चक्रिवादळ रविवारी सकाळी दक्षिण चीनच्या किनारपट्टीवर धडकले. या वादळामुळे जोरदार वारे वाहत असून मुसळधार पावसाला सरुवात झाली आहे.

145 किमी वेग असणाऱ्या चक्रि‍वादळाचा कहर, निसर्ग कोपल्याने लाखो लोक संकटात; अलर्ट जारी
China Cyclone UpdateImage Credit source: Google
| Updated on: Jul 26, 2026 | 4:31 PM
Share

भारताच्या शेजारील देश चीनवर मोठं संकट आलं आहे. नोल चक्रिवादळ रविवारी सकाळी दक्षिण चीनच्या किनारपट्टीवर धडकले. या वादळामुळे जोरदार वारे वाहत असून मुसळधार पावसाला सरुवात झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असल्याने ग्वांगडोंग प्रांतातील लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे 3:50 वाजता नोल चक्रिवादळ दक्षिण ग्वांगडोंग प्रांतातील हुइझोउ शहरातील हुइडोंग काउंटीच्या किनारपट्टीवर धडकले. हाँगकाँग वेधशाळेने सांगितले की, नोल चक्रि‍वादळाच्या केंद्राजवळ ताशी 145 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. हे वादळ रविवारी ग्वांगडोंगच्या अंतर्गत भागाकडे सरकत होते आणि हळूहळू कमकुवत होत होते. मात्र, या वादळाच्या प्रभावामुळे अनेक भागांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने कहर केला आहे.

रेल्वे सेवा रद्द

सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ग्वांगडोंग प्रांतातून 3 लाख 40 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच या प्रांतातील अनेक रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. चीनच्या राष्ट्रीय हवामान विभागाने आठवड्याच्या शेवटी दक्षिण ग्वांगडोंग आणि आग्नेय फुजियान प्रांतातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा दिला होता. त्याचाच कहर पहायला मिळाला.

तैवानलाही पावसाने झोडपलं

हाँगकाँग आणि तैवानलाही या वादळाचा तडाखा बसला. तैवान हवामान विभागाने सांगितले की, चक्रि‍वादळामुळे दक्षिण आणि पूर्व तैवानच्या काही भागांत मुसळधार पाऊस कोसळला. हे वादळ तैवानच्या दक्षिणेकडील समुद्रातून पुढे सरकत असल्याचे आता समोर आले आहे.

दक्षिण चीनला वादळाचा तडाखा

या महिन्याच्या सुरुवातीला बावी चक्रि‍वादळामुळे पूर्व चीनमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी हाहाकार माजवला होता. त्यावेळी 20 लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करावे लागले होते. हे वादळ 11 जुलै रोजी किनारपट्टीवर धडकले होते. यापूर्वी 3 जुलै रोजी मेसाक चक्रि‍वादळानेही दक्षिण चीनच्या किनारपट्टीवर धडक दिली होती, यात मोठे नुकसान झाले होते.

Follow Us
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?