
ऐश्वर्या राय नेहमीच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. आपल्या कुटुंबाचे फोटो वेळोवेळी इन्स्टावर शेअर करत असते. कधी सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे तर कधी मुलगी आराध्यासोबतचे तर कधी अभिषेक आणि लेकीसोबतचे फोटो शएअर करत असते. तिच्या इन्स्टावर एकूण 339 फोटो आहेत. पण त्यात केवळ 8 फोटोंमध्येच बच्चन कुटुंब दिसत आहे.

Aishwarya Rai Bachchan's Instagram Posts Fuel Divorce Rumors: A Deep Dive

त्यानंतर साधारण पाच महिन्यानंतर बच्चन कुटुंब असलेला फोटा तिने शएअर केला. तेव्हा आराध्याचा सातवा वाढदिवस होता. नणंद श्वेता बच्चनसोबतचा तिचा इन्स्टावरील एकमेव फोटो आहे. आराध्याच्या सातव्या वाढदिवसाचा हा फोटो आहे.

2019मध्ये तिने एक फोटो शेअर केला होता. त्यात ऐश्वर्यासोबत श्वेता नंदा, जया बच्चन आणि काही महिला दिसत आहेत.

त्यानंतर थेट वर्षभराने म्हणजे 2020मध्ये ऐश्वर्याचा एक फोटो इन्स्टावर आला. त्यात आराध्या, अभिषेक, अमिताभ आणि जया बच्चन दिसत आहेत. ऑलवेज... असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं.

12 ऑक्टोबर 2020मध्ये तिने एक फोटो शेअर करून अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

त्यानंतर 2021मध्ये तिने बच्चन कुटुंबासोबतचा शेवटचा फोटो शेअर केला. या फोटोत अमिताभ बच्चन आणि आराध्या दिसत आहे. त्यानंतर तिने बच्चन कुटुंबासोबतचा एकही फोटो शेअर केला नाही.