
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. आजही या लग्नाची आठवण येते. राय आणि बच्चन कुटुंबाने मिळून प्रत्येक विधी पूर्ण केल्या.

ऐश्वर्याच्या मेहंदी सोहळ्याची देखील तुफान चर्चा झाली. ऐश्वर्याच्या हाताला आणि पायाला देखील सुंदर मेहेंदी काढण्यात आली होती. आजही ऐश्वर्याच्या मेहेंदीची डिझाईन कॉपी केली जाते.

मेहंदी फंक्शनमध्ये ऐश्वर्या रायने बेबी पिंक रंगाचा लेहेंगा घातला होता ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. हळदी फंक्शनमध्ये अनेकदा घालल्या जाणाऱ्या लेहेंग्यासोबत ऐश्वर्याने फुलांचे दागिनेही घातले होते.

सध्या ऐश्वर्याच्या मेहेंदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षाजास्त खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते.

2007 मध्ये लग्न केल्यानंतर ऐश्वर्याने 2011 मध्ये लेक आराध्या बच्चन हिला जन्म दिला. अभिनेत्री कायम लेकीसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.