Aishwarya Rai Vs Abhishek Education : सुनबाई की मुलगा, बच्चन कुटुंबात कोण जास्त शिकलेलं?; ऐश्वर्या- अभिषेकचं शिक्षण किती ?

Aishwarya Rai Vs Abhishek Bachchan Education : अभिनेत्री ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चन यांचे चित्रपट, त्यांची कमाई याबद्दल तर आपण वाचतच असतो. अनेक दशके चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या या जोडप्याच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला माहीत आहे का ? ऐश्वर्या की अभिषेक कोणाचं शिक्षण जास्त आहे ? चला जाणून घेऊया

| Updated on: Jan 07, 2026 | 9:51 AM
1 / 5
Aishwarya Rai- Abhishek Bachchan :  ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेतील जोडप्यांपैकी एक आहेत. बच्चन कुटुंबातील मुलगा आणि सून हे दोघे, त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. लग्नानंतर ते दोघे 18 वर्ष एकत्र आहेत.  अभिनय किंवा करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऐश्वर्या ही अभिषेकपेक्षा थोडी पुढे, सरस अशीच आहे. अभिषेक चित्रपचसृष्टीत डेब्यू करायच्या आधीपासून ऐश्वर्या काम करत होती, ती त्याला थोडी सीनिअर आहे. एवढंच नव्हे तर संपत्तीच्या बाबतीतही ती अभिषेकच्या पुढेच आहे. पण शिक्षणाच्या बाबतीत नवरा-बायकोमध्ये कोण पुढे आहे हे माहीत आहे का ? अभिषेक की ऐश्वर्या कोणाचं शिक्षण सर्वाधिक झालं आहे  ?

2 / 5
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन केवळ त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळेच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतात. दोघांचेही चाहते त्यांच्याबद्दल काहीतरी नवीन आणि वेगळे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. जेव्हा जेव्हा ते एकत्र दिसतात तेव्हा ते त्यांच्या चाहत्यांना कपल गोल्स देतात. पण ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी कुठे शिक्षण घेतले आणि शिक्षणाच्या बाबतीत कोण कोणाच्या पुढे आहे ?  चला जाणून घेऊया

3 / 5
52 वर्षांच्या ऐश्वर्या रायचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. तिने मुंबईतील आर्य विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेतले. नंतर तिने जय हिंद कॉलेजमधून तिचे इंटरमिजिएट शिक्षण पूर्ण केले. एकेकाळी आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ऐश्वर्याने रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घेतला. पण नंतर तिने मॉडेलिंगच्या दुनियेत शिरकाव केला आणि नंतर तर ती नंतर ती अभिनेत्री बनली. तिने आर्किटेक्चरचं शिक्षण मध्येच सोडून दिला.

4 / 5
बच्चन कुटुंबातील धाकटा मुलगा, अभिषेक बच्चन हा आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन चित्रपट क्षेत्रात आला. 5 फेब्रुवारी 1976 साली अभिषेकचा जन्म झाला. अभिषेकने आपले शालेय शिक्षण मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल आणि दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून केले.

5 / 5
त्यानंतर त्याने बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. पुढे जाऊन अभिषेक बच्चन याने स्वित्झर्लंडमधील आइग्लॉन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. एवढंच नव्हे तर अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून बिझनेसचे शिक्षणही अभिषेकने घेतलं. पण अभिनय शिकण्यासाठी त्याने तो अभ्यास मध्येच सोडून दिला आणि तो भारतात परत आला.