Aishwarya Rai : गर्लफ्रेंडसोबत प्रोड्यूसरच असं वागणं बघून ऐश्वर्या रायने सोडला चित्रपट, अभिनेत्रीने गुपित उलगडलं

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय नेहमीच चर्चेत असते. सध्या ती फार चित्रपटांमध्ये दिसत नसली, तरी कुठल्या ना कुठल्या कारणावरुन तिची चर्चा सुरु असते. अलीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने येत होत्या. पण या जोडप्यामध्ये सर्वकाही सुरळीत असल्याच स्पष्ट झालय.

| Updated on: Feb 12, 2025 | 4:38 PM
1 / 5
ऐश्वर्या राय बॉलिवूडमधली ती अभिनेत्री आहे, जिने नेहमीच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला. ऐश्वर्या रायने एकदा एक चित्रपट सुद्धा याच कारणासाठी सोडला होता.

2 / 5
चित्रपटाचा प्रोड्यूसर त्याच्या गर्लफ्रेंडला मारहाण करायचा, हे ऐश्वर्याला पटलं नाही. अभिनेत्री फ्लोरा सैनीने 2018 मध्ये बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलेला. ज्यावेळी कोणी तिच्यासोबत काम करायला तयार नव्हतं, तेव्हा ऐश्वर्या रायने तिला सपोर्ट केलेला.

3 / 5
फ्लोराने सांगितलं की, ऐश्वर्या फक्त सपोर्ट करुनच थांबली नाही, तर तिने तो चित्रपटही सोडला, जो माझा एक्स बॉयफ्रेंड प्रोड्यूस करत होता. मला होणारी मारहाण ऐश्वर्याला पटत नव्हती.

4 / 5
"मी, जेव्हा जाहीरपणे त्या अत्याचारांबद्दल बोलली, तेव्हा मला वाटलं मी चूक केली, कारण कोणी मला काम देत नव्हतं" असं फ्लोरा सैनी म्हणाली. "माझ्या कुटुंबात मीच कमावती होते. माझ्यासाठी पैसे कमावणे खूप कठीण बनलं होतं. कुठलाही सपोर्ट नव्हता. त्यावेळी फक्त ऐश्वर्या माझ्यासोबत उभी राहिली. मी मनापासून तिची आभारी आहे" असं फ्लोरा सैनी म्हणाली.

5 / 5
ऐश्वर्या रायने चित्रपट साइन केलेला. पण नंतर तिने चित्रपट सोडला. एका महिलेवर हात उचलणाऱ्यासोबत चित्रपट करण्यास नकार दिलेला. "ज्यावेळी जग माझ्याविरोधात होतं, तेव्हा एक महिला माझ्यासोबत होती. काम कोण सोडतं? पण जेव्हा ऐश्वर्याने माझ्यासाठी हे केलं, तेव्हा माझ्यात हिम्मत आली" असं फ्लोरा म्हणाली.