
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचं वडिलांसोबत फार घट्ट नातं होतं. अभिनेत्रीचे वडील भारतीय सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत होते.

अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर कायम वडिलांसोबत फोटो पोस्ट करत असते. अनुष्का शर्मा भारतीय सैन्य दलातील कर्नल अजय कुमार यांची लेक आहे.

अभिनेत्री सेलिना जेटली हिचे फक्त वडीलच नाही तर आई देखील सैन्य दलात कार्यरत होते. सेलिना आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते.

अभिनेत्री ऐश्वर्या कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या वडिलांचं २०१७ मध्ये कर्करोगामुळे निधन झालं. ऐश्वर्याचे वडील देखील नौदल अधिकारी होते. शिवाय अभिनेत्रीचा भाऊ देखील नौदल अधिकारी आहेत.

अभिनेत्री प्रिती झिंटा बॉलिवूडपासून दूर परदेशात पती आणि जुळ्या मुलांसोबत राहत आहे. अभिनेत्रीचे वडील देखील सैन्य दलात कार्यरत होते.