अक्षय कुमारच्या मुलाचे डोळे ऐश्वर्याइतकेत सुंदर, आरवचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; मुलगीही झाली इतकी मोठी
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी 2001 मध्ये लग्न केलं. 2002 मध्ये त्यांच्या आयुष्यात आरवचं आगमन झालं, तर 2012 मध्ये निताराचा जन्म झाला. स्टारडमची मोठी पार्श्वभूमी असूनही दोन्ही मुलांना शक्य तितकं सामान्य आयुष्य देण्याचा प्रयत्न हे कुटुंब करताना दिसतं.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांची मुलं आरव आणि नितारा नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहतात. त्यामुळे त्यांची एखादी झलक समोर आली की चाहत्यांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जातं. नुकतंच दोघांना मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी आरवचा बदललेला लूक पाहून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली.
गुरुवारी, 24 सप्टेंबर रोजी ट्विंकल खन्ना तिच्या दोन्ही मुलांसोबत मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी आरवने पांढऱ्या टी-शर्टवर निळ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स असा कॅज्युअल लूक केला होता. खांद्यावर क्रॉस-बॉडी बॅग घेतलेला आरव कॅमेऱ्यांसमोर अगदी सहज वावरताना दिसला. पापाराझींनी फोटो काढण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने त्यांच्याकडे पाहून स्मितहास्यही केलं.
आरवचा हा लूक पाहून सोशल मीडिया युजर्सने त्याच्या स्टाइलचं कौतुक केलं. काही चाहत्यांनी त्याला ‘ज्युनियर अक्षय कुमार’ अशीही प्रतिक्रिया दिली. त्याच्या लूकची तुलना आजोबा आणि दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांच्याशी करणाऱ्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या.
आरवसोबत त्याची बहीण निताराही विमानतळावर दिसली. निताराने पांढऱ्या रंगाचा आउटफिट परिधान केला होता. मात्र पापाराझींनी आवाज दिल्यानंतरही तिने त्यांच्याकडे कोणतीही विशेष प्रतिक्रिया दिली नाही. ती शांतपणे पुढे निघून गेली. आरव आणि नितारा दोघेही प्रसिद्धीपासून अंतर राखत असल्याचं या व्हिडीओ आणि फोटोंमधून पुन्हा दिसून आलं.
अक्षय आणि ट्विंकल यांचा मुलगा आरव सध्या लंडनमध्ये फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे, तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास इच्छुक नसल्याचं यापूर्वी स्पष्ट झालं आहे. त्यामुळे वडील अक्षय कुमारप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रात येण्याऐवजी आरवने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग निवडल्याचं दिसतं.
अक्षय आणि ट्विंकल यांची मुलगी नितारा सध्या शिक्षण घेत आहे. भावाप्रमाणेच तिलाही शोबिझ आणि सततच्या कॅमेऱ्यांपासून दूर राहणं पसंत आहे. त्यामुळे दोन्ही स्टारकिड्स अधूनमधून सार्वजनिक ठिकाणी दिसले तरी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती समोर येत नाही.