
अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देशभरात लोक सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी करतात. पण या दिवशी देशभरात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी होत असल्याने या दिवशी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत चांगलीच वाढते.

त्यामुळे फायद्याचा व्यवहार कोणता? सोन्यात गुंतवणूक करावी का? सोनं योग्य की चांदीत गुंतवणूक फायद्याची? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामुळे फायद्याचा व्यवहार कोणता? ते समजून घेऊया...

अक्षयतृतीयेला परंपरा लक्षात घेऊन लोक दागिने खरेदी करतात. पण गुंतवणूक करण्यासाठी गोल्ड ईटीफए आणि म्युच्यूअल फंड हे दोन पर्यायही चांगले आहत.

ईटीएफ आणि म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास दागिन्यांच्या घडणावळीचा खर्च वाचतो तसेच दागिन्यांच्या सुरक्षेचीही चिंता नसते.

ईटीएफ आणि म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात तसेच तुमची बचतही होऊ शकते. डिजिटल गोल्ड हादेखील चांगला पर्याय आहे. या मार्गाचा अवलंब करून तुम्ही थोडे-थोडे सोने खरेदी करू शकता.

चादी या मौल्यवान धातूकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. कारण आजकाल अनेक वस्तूंमध्ये चांदी या धातूचा वापर होत आहे. त्यामुळे भविष्यात या धातूचीही किंमत वाढण्याची शक्यता आहे.

अक्षयतृतीयेला सोन्यात गुंतवणूक करू इच्छितात त्यांनी परंपरा म्हणून थोडे सोने करणे आणि जास्तीत जास्त पैसे गोल्ड ईटीएफ किंवा म्युच्यूअल फंडात टाकणे हा पर्याय चांगला ठरू शकतो. थोडे पैसे चांदीमध्येही गुंतवता येतील.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)