Dhurandhar : अक्षय खन्नाला ज्याने… ‘धुरंधर’ पार्ट 2 मध्ये मोठा ट्विस्ट, अखेर तो दिसणार !

Dhurandhar 2 Big Entry : महिन्याभरापूर्वी रणवीर सिंहचा 'धुरंधर' रिलीज झाला. या चित्रपटाने तूफान कामगिरी करत प्रचंड कमाई केली असून अनेक रेकॉर्डस तोडलेत. 33 व्या दिवशी चित्रपाटने 4 कोटींचा बिझनेस केला आहे. आता या चित्रपटाच्या पार्ट 2 ची सगळेजण वाट पहात असून तो 19 मार्चला रिलीज होणार आहे.

| Updated on: Jan 07, 2026 | 1:27 PM
1 / 7
Dhurandhar 2 Big Entry : 'धुरंधर' चित्रपट महिन्याभरापूर्वी रिलीज झाला. 33 व्या दिवशीही चित्रपटाची घोडदौड सुरूच असून तूफान काही थांबताना दिसत नाहीये.  रणवीर सिंगच्या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 1240  कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. दरम्यान, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतात आतापर्यंत 781 कोटींची कमाई केली आहे. पाचव्या मंगळवारी, चित्रपटाने 4.75 कोटी कमावले. याच दरम्यान आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

2 / 7
रणवीर सिंगच्या धुरंधर या चित्रपटाचा दुसरा भाग 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. पहिल्या भागात शानदार अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारा अक्षय खन्ना मातर या चित्रपटात दिसणार नाहीय पहिल्या भागत रेहमान डकैतचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यत आलं होतं. त्यामुळे त्याची भूमिका तिथेच संपली.  पण सिक्वेलमध्ये एक अशी नवीन एन्ट्री आहे जी पाहून तुम्हीही खुश व्हाल. हाच तो माणूस आहे ज्याने अक्षय खन्नाला चमकवले.

3 / 7
या चित्रपटाची कथा आणि कलाकारांव्यतिरिक्त, इंटरनेटवर आता सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या गोष्टी म्हणजे त्यातले संवाद आणि गाणीही.  "धुरंधर" चित्रपटात अक्षय खन्नाचवर शूट झालेलं "Fa9la" हे गाणं जाम गाजतंय, प्रत्येकाच्या तोंडी त्याची धून आहे. लोकांनी त्यावर  अनेक व्हिडीओही बनवले आहे, हे गाणं खूप ट्रेडिंगमध्ये आहे. आता याचा गाण्याच्या क्रिएटरने तगडी हिंट दिली आहे.

4 / 7
खरंतर चित्रपटात अक्षय खन्नावर जे गाणं शूट झालं, ते Fa9la गाणं बहरीन गायक -प्रोड्युसर फ्लिपेराची याने गायलं होतं. त्याचं खरं नाव हुसाम असीम आहे. Fa9la  ला जो रिस्पॉन्स मिळाला, त्याने तो खूप आनंदी आहे. आणि हे गाणं "धुरंधर 2" मध्ये परत वाजू शकतं. याबद्दल काय अपडेट्स आलेत ते जाणून घेऊया.

5 / 7
खरं तर, फ्लिपेराची एका न्यूज वेबसाइटशी बोलत होता. हे गाणं Fa9la चित्रपटात दिसल्यापासून त्याचं आयुष्य बदलल्याचं त्याने सांगितलं. "खरं सांगायचं तर, ते अद्भुत आहे. मला दररोज हजारो मेसेज येतात. हे खूप शानदार आहे " अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.

6 / 7
'धुरंधर'च्या दुसरा पार्ट येण्याची आधीच घोषणा झाली असताना इतर कोणतं गाण पिक्चरमध्ये असेल का असा सवाल फ्लिपेराची याला विचारण्यात आला. तेव्हा त्याने स्पष्ट उत्तर दिलं नाही. पण त्याने ती शक्यता नाकारली देखील नाही.  तो म्हणाला - खरंतर काहीही घडू शकतं ना. मी याबद्दल सरप्राईज ठेवणार होतो, पण असं काही घडू शकतं, अशी हिंटच त्याने दिलीय

7 / 7
त्यामुळे धुरंधर पार्ट 2 मध्ये फ्लिपराचीचं दुसरं एखादं गाणं येतं का, ते कोणाच्या एंट्रीसाठी वाजेल, अशी उत्सुकता चाहत्यांच्या मनात आहे. या चित्रपटाची लोकं आतुरतेने वाट पहात आहेत.