Alanna Panday Baby Shower : अनन्या-आहानला लावलं ड्युटीवर, अलाना पांडेने शेअर केले बेबी शॉवरचे क्युट फोटो
Alanna Panday Baby Shower Photos: अलाना पांडेच्या बेबी शॉवरचे खास क्षण समोर आले आहेत. अनन्या पांडे आणि अहान पांडे यांनीही हजेरी लावली, त्यांचे "आंटी" आणि "अंकल" ड्युटीचे फोटो व्हायरल झाले. अलाना दुसऱ्यांदा आई होणार असून, कुटुंब आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

Alanna Panday Baby Shower Photos: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांड्याची चुलत बहिण अलाना पांडे पुन्हा एकदा आई होणार आहे. अलीकडेच त्यांच्या बेबी शॉवरचे सोहळा पार पडला, ज्यात अनन्या देखील उपस्थित होत्या. अलानाने सोशल मीडियावर बेबी शॉवरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. (All Photos : Social Media)
अलाना आणि इव्होर मॅकक्रे हे दोघे 2023 साली विवाहबंधनात अडकले. तर 2024 साली त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला, आता हे जोडपं दुसऱ्यांदा बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील या फोटोंमध्ये इव्होरही दिसत आहेत. या खास क्षणी सर्वजण खूप आनंदी दिसले.
अनन्या पांडे तिची चुलत बहीण अलानाच्या खूप जवळ आहे. दोघींमध्ये खूप छान नातं आहे. अलानाने सांगितले की, डोहाळे जेवणाच्या वेळी अनन्या मावशीची जबाबदारी पार पाडत होती. अनन्याने घातलेल्या टी-शर्टवरही ‘आंटी’ असे लिहिलं होतं.
‘सैयारा’ फेम अहान पांडे हा अलानाचा भाऊ आहे. तोही या प्रसंगी खूप आनंदी दिसत होता. अलानाने सांगितले की, अहान काकाची जबाबदारी पार पाडत होता. या कार्यक्रमातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी अलाना आणि इव्होर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
“आंटी आणि अंकल ड्युटीवर! आणि शेवटी रिव्हर आमच्या सगळ्यांना कंटाळून गेला .” असं अलानाने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं. रिव्हर हे अलानाच्या मुलाचे नाव आहे. या कार्यक्रमात प्रत्येकजण त्याला कडेवर घेऊन फोटो काढताना दिसत आहे.
अलाना पांडे ही अभिनेता चंकी पांडे यांची पुतणी आहे. चंकी यांचा धाकटा भाऊ चिक्की पांडे यांची ती मुलगी आहे. अनन्या आणि अहान यांनी चित्रपटसृष्टीत करिअर घढवत आहेत, तर अलाना ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर आहे. ती पतीसोबत अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे राहते.