
अली दादरकर (Ali Dadarkar) - आलिया आणि अली यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना एकेकाळी उधाण आलेला. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आलिया, अली याला डेट करत होती. पण बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर आलिया हिने अली याच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडले.

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) - रिपोर्टनुसार आलिया आणि सिद्धार्थ देखील रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले. पण दोघांनी कधीच त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. अनेक सिनेमांमध्ये देखील दोघांनी काम केलं आहे.

वरुण धवन (Varun Dhawan) - आलिया आणि वरुण यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं. दरम्यान दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरलेला... दोघांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

कविन मित्तल (Kavin Bharti Mittal) - आलिया भट्टचे अनेक स्टार्ससोबत तसेच उद्योगपती सुनील मित्तल यांचा मुलगा कविन मित्तलसोबत अफेअर असल्याची चर्चा रंगलेली. पण, दोन्ही बाजूंनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) - अनेक वर्ष रणबीर कपूर याला डेट केल्यानंतर अभिनेत्रीने अभिनेत्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये आलिया आणि रणबीर यांनी लग्न केलं. लग्नानंतर आलिया हिने लेक राहा हिला जन्म दिला... सोशल मीडियावर कायम तिघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.