
रणबीरच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट लिहीतानाच आलियाने सोशल मीडियावर त्यांचे काही खास, अनसीन फोटोही शेअर केले आहेत. ( Photos : Alia Bhatt Instagram)

यापैकी काही फोटो त्यांच्या लग्नातले तर काही फोटो हे बाहेर फिरतानाचे आहेत. त्यामध्ये दोघेही एकमेकांसोबत खूप खुश दिसत आहेत.

माझं प्रेम, माझा सगळ्यात चांगला मित्र.. माझ्या बाजूलाच बसून सिक्रेट अकाऊंटवरून तू हे वाचत असशील. मला तुला एवढंच सांगायचंय की - हॅपी बर्थडे ! असं आलियाने रणबीरच्या वाढदिवसानिमित्त लिहीलं.

आलियाच्या या पोस्टमुळे रणबीरच्या सिक्रेट अकाऊंटबद्दल लोकांची उत्सुकता पुन्हा वाढली आहे.

तिच्या या बर्थडे पोस्टला लाखो लाइक्स आले असून अनेक सेलिब्रिटींनीदेखील रणबीरला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.